एकदिलाने काम करून संघटना मजबूत करा : उदय सामंत

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर जिल्हा पुन्हा न शिवसेनेचा बालेकिल्ला करण्यासाठी न कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम न करून संघटना मजबूत करावी, सर्वसामान्य नागरिकांची कामे प्राधान्याने पूर्ण करून शासनाच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत न पोहोचवावा, असे आवाहन वे शिवसेना पक्षाचे उपनेते, प्रवक्ते तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
T
सिल्लोड येथील शिवसेना भवन प्रांगणात त्यांच्या अध्यक्षतेखाली ई तसेच लोकसभा संपर्कप्रमुख न खासदार संदीपान भुमरे यांच्या न प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात र झाला. व्यासपीठावर आमदार अब्दुल सत्तार, संपर्कप्रमुख विलास पारकर, माजी खासदार ई राहुल शेवाळे, माजी आमदार अण्णासाहेब माने, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगराध्यक्ष अब्दुल समीर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख पुष्पा गव्हाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मेळाव्यात पुढे बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यकत्यांना संघटन मजबुतीचे धडे देत युवकांची मजबूत फळी निर्माण करण्यावर भर दिला. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढवण्यासाठी प्रत्येकाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी झोकून देऊन काम करावे, असेही त्यांनी सांगितले. पुढे बोलताना उदय सामंत यांनी पक्षामध्ये कोणतीही गटबाजी खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले.

प्रत्येकाने पक्षाला प्रथम प्राधान्य देत संघटन वाढीसाठी काम करावे, असे त्यांनी नमूद केले. अयुवक व महिलांचा एसआयआरमध्ये अधिक सहभाग वाढवण्यावर भर देत ग्रामीण भागातील शिवसेना शाखांची पुनर्बाधणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सिल्लोडच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. 

जिल्ह्यात कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, सोयगाव नगराध्यक्षा आशा बी. तडवी, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर काळे, देविदास लोखंडे, किशोर अग्रवाल, शहरप्रमुख मनोज झंवर, जि. प. सदस्य अब्दुल आमेर, देविदास पालोदकर, सय्यद नासिर हुसेन, राजु बाबा काळे, युवा सेनेचे धैर्यशील तायडे, अक्षय मगर, कृउबा समितीचे सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत, संचालक दामू अण्णा गव्हाणे, नंदकिशोर सहारे, नानासाहेब रहाटे, दारासिंग चव्हाण, भावराव लोखंडे, रमेश लाठी, शेख जावेद, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते सुधाकर पाटील, माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, अशोक सूर्यवंशी, विनोद मंडलेचा, रमेश साळवे, गणेश गरुड, अनिस पठाण, पांडुरंग दुधे, रामदास पालोदकर, नरेंद्र बापू पाटील, राजेंद्र ठोंबरे, रउफ बागवान, डॉ. विठ्ठल जाधव, प्रशांत क्षीरसागर, सत्तार हुसेन, शंकरराव खांडवे, शेख सलीम हुसेन, शिवआप्पा चोपडे, गोपीचंद जाधव, सयाजीराव वाघ, संजय डमाळे, शेख बाबू, मधुकर गवळी, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, शकुंतला बनसोड, मेघा शहा, सिद्धेश्वर आहेर, नजीर अहमद, शेख रब्बानी, कौतीकराव मोरे, गणेश पाटील, प्रवीण मिरकर, बबलू पठाण, सुधाकर गायकवाड, डॉ. फिरोज खान, राजूमिया देशमुख, राजाराम पाडळे, मोतीराम पाडळे, रामेश्वर वाघ यांच्यासह विविध गावांतील आजी माजी सरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.